फोटोज : सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे #FallingStarsChallenge
या चॅलेंजेचे नाव आहे #FallingStarsChallenge.
गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटने आपल्या सोशल मिडीया मैदानावर अनेक नवनवीन चॅलेंजेसना आसरा दिला आहे. किवी चॅलेंजेने तर संपूर्ण जगाला वेड लावले होते. आता अजून एक नवे चॅलेंजे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या चॅलेंजेचे नाव आहे #FallingStarsChallenge.
रस्त्यावरून जातात तुम्हाला एखादी व्यक्ती हातात असलेल्या सामानासह खाली पडलेली दिसली, त्या व्यक्तीचे सर्व समान विखुरलेले दिसले तर साहजिकच तुमची पावले त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी सरसावतील. मात्र अशा व्यक्तीला मदत करण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार करा कारण ते #FallingStarsChallengeही असू शकते.
सोशल मिडीयावर तुम्हाला अनेक असे फोटोज दिसतील ज्यामध्ये विविध ठिकाणी व्यक्ती पालथे पडलेले दिसतील, त्यांच्याकडील सर्व वस्तू आजूबाजूला विखुरलेल्या दिसतील. तर हे सोशल मिडीयावरील नवीन चॅलेंजे आहे.
या चॅलेंजेमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे. आपल्याकडील महागाच्या वस्तू, कपडे, मेकअप साहित्य या चॅलेंजेद्वारे लोकांना दाखवण्याचे कार्य, थोडक्यात शो-ऑफ या चॅलेंजेद्वारे करण्यात येत आहे.
बरेचवेळा पाय घसरल्याने अथवा इतर कारणांमुळे सर्वांसमोर खाली पडल्याने खजील झाल्यासारखे वाटते. स्वतःचीच लाज वाटते. अशा वेळी आपण खाली पडलेले साहित्यही पटकन उचलून आपल्या पिशवीत भरण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता तुम्हाला याबाबत विचार करण्याची गरज नाही. तुम्ही खाली पडलात तरीही #FallingStarsChallengeद्वारे आपल्या सामानाचा शो-ऑफ करा.