Maratha Regiment Ganpati Celebration: कारगिल मध्ये जवानांंनी ढोलताशाच्या गजरात केलं बाप्पाचं स्वागत? पहा या Viral Video चं फॅक्ट चेक
कारगिल (Kargil) मधील मराठा रेजिमेंटचे (Maratha Regiment) सैनिक सुद्धा बाप्पाचं स्वागत करताना दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मेजर शैलेंद्र सिंह या ट्विटर अकाउंट वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे
Ganeshotsav 2020: अगदी नेहमी कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे सैन्यातील जवान (Indian Army) सणांंच्या वेळी अगदी काही वेळ काढुन का होईना आपल्या सैनिक बांंधवांंसोबत मनमोकळे पणाने आनंंद साजरा करतात. मागील विकेंडला म्हणजेच 22 ऑगस्ट ला भारतातील सर्वात मोठा असा गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण सुरु झाला आहे. याच निमित्ताने कारगिल (Kargil) मधील मराठा रेजिमेंटचे (Maratha Regiment) सैनिक सुद्धा बाप्पाचं स्वागत करताना दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मेजर शैलेंद्र सिंह या ट्विटर अकाउंट वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात मराठा लाईट इन्फंट्री चे जवान ढोल ताशा, झांजा वाजवत बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत एंजॉय करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असला तरी हा खरंच यंंदाचा व्हिडिओ आहे का याविषयी अनेकांंनी सवाल केला होता. ज्यावरुन तपास करताच समोर आलेले Facts आता आपण पाहणार आहोत.
प्राप्त माहितीनुसार आता व्हायरल होणारा व्हिडिओ हा ओरिजनल मराठा लाईट इन्फंट्री च्या जवानांचा गणेशोत्सवाच्या वेळी बाप्पाचे स्वागत करतानाचा आहे हे खरंं आहे, मात्र हा व्हिडिओ 2020 मधील नसुन गत वर्षीचा आहे. हाच व्हिडिओ मागच्या वर्षी युट्युब वर अपलोड करण्यात आला होता जो यंंदा केवळ तारिख बदलुन ट्विटर अकाउंट वरुन शेअर करण्यात आला आहे.
सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ
मुळ व्हिडिओ
दरम्यान, सध्या कोरोनाचे संंकट असताना तसेच चीन विरुद्ध, पाकिस्तानी दहशतवाद्यांंविरुद्ध सीमा रेषेवर तणावपुर्ण परिस्थिती असल्याने या व्हिडिओ बाबत शंंका निर्माण होत होत्या, मात्र आता हा जुना व्हिडिओ असल्याचे सिद्ध होत आहे. व्हिडिओ जुना असला तरी यातील सैनिक बांंधवांंच्या चेहर्यावरील आनंंद आणि नाचतानाचा उत्साह वारंंवार पाहण्यासारखा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)