IPL Auction 2025 Live

Fact Check: ऐश्वर्या राय बच्चन, आराध्यासोबत बागेश्वर धाम सरकार उर्फ ​​धीरेंद्र शास्त्रींना भेटली होती का? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य खोटे दावे

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीयो व्हायरल होत असून त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनी बागेश्वर धाम सरकार किंवा धीरेंद्र शास्त्री यांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Aishwary-aaradhya

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरुन अनेकांनी एक व्यायरल व्हिडीयो शेअर करत असा दावा केला होता की बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनी बागेश्वर धाम सरकार किंवा धीरेंद्र शास्त्री यांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या व्हिडीयोमध्ये दिसत होते की एश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघी एका कार्यक्रमाला पोहचल्या आहेत. ज्यामध्ये पुढे बागेश्वर धाम सरकार किंवा धीरेंद्र शास्त्री हे देखील दिसत आहे.

पण यातील सत्य असे आहे की हा व्हायरल व्हिडीयो हा एडिटेड आहे. फॅक्ट चेकमध्ये आम्हाला असे आढळले की हे दोन व्हिडीयो असून त्यांना एकत्र जोडले आहे. हे दोन्ही व्हिडीयो दोन वेगवेगळ्या इव्हेंटचे आहे. हे दोन्ही व्हिडीयो एकत्र करुन हा दावा केला गेला की एश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. खरेतर हा एश्वर्या आणि आराध्या व्हिडीयो हा तीन वर्ष जुना असून युट्यूबवर तो उपलब्ध आहे. यामध्ये त्या दोघी दुर्गा पुजासाठी गेल्या असल्याचे दिसत आहे.

पहा - ऐश्वर्या राय आणि आराध्याचा मुळ व्हिडीयो

तर दुसरा व्हिडीयो हा बागेश्वर धाम यांचा असून तो जानेवारी आठ तारखेचा आहे. हा व्हिडीयो जवळपास एक तास 27 मिनीटांचा आहे.

पहा बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र शास्त्री यांचा व्हिडीयो -

या दोन्ही व्हिडीयो ना एकत्र करत फेक व्हिडीयो बनवला असल्याचे आम्ही केलेल्या फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे  ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनी बागेश्वर धाम सरकार किंवा धीरेंद्र शास्त्री यांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती हा दावा खोटा आहे.