Dog Repellent: कुत्र्यांना घाबरता? 'हे' 300 रुपयांचे उपकरण ठेवा खिशात, मग पाहा गंमत; भुंकणे तर दूरच, जवळपासही फिरकणार कुत्रा
त्याहून कुत्र्यांना घाबरणाऱ्यांची संख्या अधिक असावी कदाचित. त्यातही पाळीव कुत्र्यांपेक्षा मोकाट कुत्र्यांची अनेकांना भीती असते. पण काळजी करु नका. तुम्ही कुत्र्यांना घाबरता? आता कुत्र्यांना घाबरण्याचे कारण नाही. होय, एका कंपनीने एक असे उपकरण आणले आहे.
Dog Repellent Device: कुत्रे पाळणाऱ्यांची संख्या जितकी आहे. त्याहून कुत्र्यांना घाबरणाऱ्यांची संख्या अधिक असावी कदाचित. त्यातही पाळीव कुत्र्यांपेक्षा मोकाट कुत्र्यांची अनेकांना भीती असते. पण काळजी करु नका. तुम्ही कुत्र्यांना घाबरता? आता कुत्र्यांना घाबरण्याचे कारण नाही. होय, एका कंपनीने एक असे उपकरण आणले आहे. ते तुम्ही फक्त खिशात ठेवायचे किंवा स्वत:सोबत बाळगायचे. झाले. कुत्रा चावणे सोडा तुमच्या आसपासही फिरणार नाही. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे उपकरण सोबत ठेवले तर कुत्रा तुमच्या जवळ येणार नाही. अनेकांना कंपनीच्या या दाव्याबाबत आश्चर्य वाटते. आम्हीही त्याची पुष्टी करत नाही. परंतू, इंटरनेटवर हे उपकरण विक्रीस आहे.
Dog Repellent असे या उपकरणाचे नाव आहे. Dog Repellent Device आपल्याला कोणत्याही ऑनलाईन साईटवर मिळू शकेल. ज्याची किंमत समान्य नागरिकालाही परवडेल असे सांगितले जाते. सोशल मीडिया आणि एका साईटवर मिळालेल्या माहितीनुसार हे डिवाइस 300 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या किमतीमध्ये ग्राहकाला उपलब्ध होऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, हे डिवाईस सोबत बाळगल्यावर कुत्रा जवळही फिरकणार नाही. आपल्या पाळीव कुत्र्याला ट्रेनिंग देण्यासाठीही हे उपकरण कामी येऊ शकते, असे कंपनी सांगते. (हेही वाचा, International Dog Day 2022: आंतरराष्ट्रीय श्वान दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व)
दरम्यान, Dog Repellent Device ऑपरेट करण्यासाठी 9 वॉल्टच्या बॅटरीची आवश्यकता असते. हे डिवाइज अल्ट्रासोनिक साऊंडही काढते. ज्यामुळे कुत्रा जवळ येत नाही. या डिवाईस सोबत बॅटरी येत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र बॅटरी घ्यावी लागते. हे डिवाईस आकारालीही छोटे आहे. त्यामुळे ते खिशात ठेऊन तुम्ही कुठेही फिरू शकता. अॅमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार या उपकरणााचा आकार 12.8X4X2.8 cm इतका आहे. त्याची रेंज 9.8 फूट म्हणजेच 3 मिटर इतकी आहे.