दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2020: मनोज तिवारी यांच्या ‘रिंकिया के पापा’वर ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा भन्नाट डान्स व्हायरल (Watch Video)
मजेशीर बाब म्हणजे, या कार्यकर्त्यांनी डान्स करताना भाजपचे नेते आणि दिल्लीतील विधानसभेचे उमेदवार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचे रिंकीया के पापा (Rinkiya Ke Papa) हे गाणे निवडले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Delhi Vidhansabha Elections Results) आम आदमी पक्षाला (AAP) एकहाती विजय प्राप्त झाला आहे, बहुमताच्या पार जाऊन केजरीवाल यांच्या पक्षाने 70 पैकी 63 जागी (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) आघाडी घेतली आहे, यातील 26 जागी विजय मिळवत आता केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले आहे. साहजिकच या आनंदाचे आपच्या कार्यकर्त्यांकडून जंगी सेलिब्रेशन केले जातेय. आपच्या मुख्यालयाबाहेर मिठाई वाटून, नाचून आताही उत्साहात सेलिब्रेशन सुरु आहे. यातील मजेशीर बाब म्हणजे, या कार्यकर्त्यांनी डान्स करताना भाजपचे नेते आणि दिल्लीतील विधानसभेचे उमेदवार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचे रिंकीया के पापा (Rinkiya Ke Papa) हे गाणे निवडले होते. हा डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून यावर अनेकांच्या मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत. Delhi Assembly Election Results 2020 Live Updates
दुपारी बारानंतर आपने घेतलेल्या निर्णयक आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दिल्लीमध्ये ठिकठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. अनेक ठिकाणी चौकाचौकांमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी गाणी लावून डान्स केला. विशेष म्हणजे यावेळेस आपच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम भाजपाचे नेते असणाऱ्या मनोज तिवारी यांच्या चित्रपटातील गाण्यांवर डान्स केल्याचे पहायला मिळाले. काही वेळापूर्वीच केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि दिल्ली वासियांचे आभार मानत हा भारताचा विजय आहे असे म्हंटले होते.
पहा हा व्हायरल डान्स व्हिडीओ
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या प्रचारसत्रात भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी अनेकवेळा आप सहित केजरीवाल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. इतकेच नव्हे तर एग्झिट पोल मध्ये निकालाचे आकडे आपच्या दिशेने झुकलेले असतानाही भाजप जवळपास 55 जागी विजय मिळवेल असा आशावाद सुद्धा तिवारी यांनी व्यक्त केला होता, आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच प्राथमिक कल जेव्हा आपच्या बाजूने येऊ लागले तेव्हा सुद्धा मनोज तिवारी यांनी आपण निदान 48 जागी तरी विजय मिळवूच असाही दावा केला होता, मात्र आता सलग आठ तासांच्या मतमोजणींनंतर केजरीवाल यांचा विजय स्पष्ट आहे, अशा वेळी मनोज यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन करत आपला पराभव मान्य केला आहे.