COVID 19 Monitoring Committee बनवल्याचं व्हायरल नोटिफिकेशन खोटं; केंद्रीय गृह मंत्रालयाने केला खुलासा

त्याबाबतचे सर्क्युलर देखील व्हायरल झालं होतं. मात्र आज केंद्रीय गृहखात्याच्या (Union Home Ministry) प्रवक्त्यांनी अशाप्रकारे कोणतीही समिती बनवली नसल्याचं सांगितलं आहे.

Fake COVID19 Monitoring Committee | Photo Credits: Twitter/ ANI

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभर आपली दहशत निर्माण केल्यानंतर या भीतीचा गैरफायदा घेत अनेक फेक न्यूज (Fake News) सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान यामध्ये केंद्रीय गृहखात्याकडून COVID 19 Monitoring Committee बनवली असल्याची माहिती समोर आली होती. त्याबाबतचे सर्क्युलर देखील व्हायरल झालं होतं. मात्र आज केंद्रीय गृहखात्याच्या (Union Home Ministry)  प्रवक्त्यांनी अशाप्रकारे कोणतीही समिती बनवली नसल्याचं सांगत व्हायरल होत असलेलं परिपत्रक खोटं असल्याची माहिती दिली आहे.

सोशल मीडीयामध्ये पसरत असलेल्या परिपत्रकामध्ये 25 जणांची विविध विभागातील नावं जाहीर करण्यात आली होती. तसेच यामध्ये गृहखात्याकडून जारी करण्यात आलेल्या SOP बद्दल सामान्यांनी सूचना कराव्यात यासाठी एक इमेल आयडी देखील देण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारची कोणतीही समिती बनवली नसल्याचं आज केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केलं आहे.

ANI Tweet

दरम्यान भारतामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज भारतामध्ये 27 हजारांपेक्षा अधिक रूग्ण मागील 24 तासांमध्ये आढळले आहेत. देशात आता कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 8,20,916 च्या पार पोहचला आहे. देशामध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरू आहे. यामध्ये काही भागांत संचारबंदीला शिथिलता देत व्यवहार पुन्हा सुरू करण्याला मुभा आहे.