Viral Video : ...जेव्हा 'आज जाने की जिद ना करो' ही गझल ब्रिटिश गायिका गाते !
भारतात संगीतप्रेमींची काही कमी नाही. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे अनेक गायक भारतात आहेत. पण एखाद्या ब्रिटिश गायकाने हिंदी गाणे गाऊन प्रेक्षकांची दाद मिळवणे, अगदी कौतुकास्पद आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका ब्रिटिश गायिकेने हिंदीतील जूने गाणे 'आज जाने की जिद ना करो' हे गाणे गाऊन प्रेक्षकांची दाद मिळवली.
'आज जाने की जिद ना करो' हे गाणे फय्याज हाश्मी यांनी लिहीलेले असून गायिका फरीदा खानम या गायिकाने त्यावर स्वरराज चढवला आहे. पण ब्रिटीश गायिका तान्या वेल्स या गायिकेने गायलेले हे गाण सध्या बरीच चर्चा होत आहे.
तान्या वेल्स ही मुळची लंडनची असून अनेक वर्ष उत्तर भारतात राहून भाषा आणि संगीताचा अभ्यास केला आहे. आपल्या भाषेपलीकडे जात नवीन भाषेतील बारकावे जाणून घेत शब्दांच्या अर्थासहीत तिने हे गाणे गायले. त्यातील भाव तिच्या गायिकीतून अगदी उत्तमरीत्या प्रकट झाले आहे.