Uttar Pradesh: लग्नासाठी वराच्या घरी चक्क घोड्यावर बसून पोहोचली तरुणी, अनोख्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल
या सोहळ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Muzaffarnagar, Nov 30: भारतात पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे घोड्यावर येणारा नवरदेव आणि मांडवात वाट पाहणारी नवरी आपण सगळीकडे पहिली असेल. परंतु एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने या परंपरा मोडून काढत चक्क घोडागाडीवर बसून वराच्या घरी गेली. या सोहळ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वधू सिमरन असे वधूचे नाव आहे. पगडी घातलेल्या वधूचा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. या अनोख्या वरातीचा व्हिडीओ यूपीच्या मुझफ्फरनगर येथील आहे.
पाहा व्हिडीओ :
सिमरन म्हणाली, "येथ वर सहसा घोड्यावर स्वार होतो. परंतु आज मी घोड्यावर स्वार होऊन आले आहे. मला कधीही मुलीसारखे वागवले गेले नाही. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला. सर्व मुलींना संदेश द्यायचा होता ज्यांना वाटते की, ज्या मुली स्वतःला मुलांपेक्षा कमी लेखतात." सिमरन सुमारे दोन वर्षांपासून यूएई येथे काम करत होती. सिमरनने उत्तराखंडमधील काशीपूर येथील दुष्यंत चौधरी यांच्याशी लग्न केले. दुष्यंत अभियंता आहे. सोमवारी त्यांचे लग्न पार पडले.