Anjali Arora Recreates 'Aaj Ki Raat': तमन्ना भाटिया हिच्या 'आज की रात' गाण्यावर 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा हिचा डान्स व्हायरल (Watch Video)

तिने तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिच्या आगामी चित्रपट 'Stree 2's' या चित्रपटातील 'आज की रात' गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स एक प्रकारची पुननिर्मीती आहे.

Anjali Arora | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सोशल मीडिया सेन्सेशन अंजली अरोरा (Anjali Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिच्या आगामी चित्रपट 'Stree 2's' या चित्रपटातील 'आज की रात' गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स एक प्रकारची पुननिर्मीती आहे. ज्याची सोशल मीडियावर (Anjali Arora Viral Video) जोरदार चर्चा आहे. तसेही अंजलि अरोडा (Anjali Arora xxx) आपल्या रिल्स आणि हटके डान्सने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. "कच्चा बदाम" हा तिचा सर्वाधीक गाजलेला व्हिडिओ. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, लोक तिला आता "कच्चा बदाम" फेम म्हणूनच ओळखतात.

'आज की रात'

'आज की रात' गाण्यावर डान्सचा एक व्हिडिओ अंजली अरोरा हिने आपल्या सोशल मीडिया हँडलवरही शेअर केला आहे. या गाण्यात इंस्टाग्रामवर, मॅरून ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप आणि मर्मेड स्कर्टमध्ये सुंदर दिसत आहे. तिची अदा पाहून चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया द्यायाला सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, अंजली अरोराच्या 'आज की रात' गाण्यावरील डान्समध्ये तिने स्टायलिश कमरबंद ऍक्सेसरी घातलेली आहे. ज्यामुळे तिचा लुक वाढतो. तुम्ही तिच्या मनमोहक नृत्याच्या हालचाली खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

Stree 2 चित्रपट

Stree 2 हा अमर कौशिक दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी निर्मित केलेला हा एक कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. 2018 च्या हिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्यासोबत श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

इन्स्टा पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कोण आहे अंजली अरोरा?

अंजली अरोरा यांनी प्रथम तिच्या "कच्चा बदाम" गाण्याच्या डान्स व्हिडिओने लक्ष वेधून घेतले. नंतर ती कंगना राणौतने होस्ट केलेल्या आणि एकता कपूर निर्मित, लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये दिसली. ती आकाश संसनवाल याला डेट करत आहे. ज्यांच्यासोबत ती अनेकदा ऑनलाइन फोटो शेअर करत असते.

अंजली आणि वाद

एका कथित एमएमएस व्हायरल क्लिपमुळे अंजली चर्चेत आली होती. ज्यामुळे तीने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. कंगना रानावत हिच्या एका कार्यक्रमात तिने म्हटले की, अशा कथीत व्हिडिओंमुळे व्यक्तीची प्रतिमा मलीन होते. परंतू, कुटुंबीयही दुखावले जातात. दरम्यान, अशाही अफवा आहेत की अंजली एका पौराणिक चित्रपटात काम करणार आहे, तिच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा.