अहमदनगर मधील डॉक्टारांचे Prescription Viral; ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून औषधांसोबत दिला 'हा' खास सल्ला (See Pic)

यातच अहमदनगर मधील डॉक्टरांची एक अनोखे प्रिस्क्रिप्शन व्हायरल होत आहे. यात डॉक्टरांना औषधांसोबत एक झाड लावण्याचा सल्ला दिला आहे.

Viral Doctor's Prescription (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचे दाहक रुप सध्या महाराष्ट्र अनुभवत आहे. कोविड-19 (Covid-19) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे परिस्थिती गंभीर झाली असून नागरिकांची चिंता वाढली आहे. यातच अहमदनगर (Ahmednagar) मधील डॉक्टरांची एक अनोखे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Prescription Viral) होत आहे. यात डॉक्टरांनी औषधांसोबत एक झाड लावण्याचा सल्ला दिला आहे. राम कोकाटे यांनी एका झाडाची किंमत असं म्हणत हे प्रिस्क्रिप्शन सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

अहमदनगर मधील संजीवनी हॉस्पिटल मधील डॉ. युवराज व कोमल कासार यांचे हे प्रिस्क्रिप्शन आहे. कालच्या त्यांच्या रुग्णाला त्यांनी औषधांसोबत एक झाडं लावण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला केवळ तोंडी नसून डॉक्टारांनी चक्क प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहिले, "आजारातून बरे झाल्यावर एक झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजनची कमी पडणार नाही."

पहा ट्विट:

(हे ही वाचा: रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांनी Sunny Deol च्या 'या' गाण्यावर PPE Kit घालून केला डान्स; पहा Viral Video)

डॉक्टारांच्या या खास सल्ल्याची सध्या सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे. शहरीकरण आणि औद्योकीकरणात मानवाकडून निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. त्याची परतफेड मानवाला नक्कीच करावी लागणार आहे. त्यामुळे झाडं लावण्याचं महत्त्व शाळेपासून आपल्याला पटवून देण्यात आलं आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येकासाठीच सध्याची परिस्थिती आणि डॉक्टरांचे हे व्हायरल प्रिस्क्रिप्शन डोळ्यात अंजन घालायला लावणारे आहे.