Shocking Video: हरियाणा मधील बल्लभगढ़ स्टेशन जवळ 13 वर्षांच्या मुलाने 2 वर्षांच्या मुलाला मालगाडीच्या इंजिनाखाली फेकले; पहा व्हायरल व्हिडिओ

मात्र काही मुलांच्या मस्तीमुळे दुर्घटना घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Boy Gets Stuck Under Train Engine (Photo Credits: ANI)

रेल्वे रुळ ओलांडणे धोक्याचे असल्याने वारंवार रेल्वे विभागाकडून नागरिकांना सूचना देऊन सतर्क करण्यात येते. मात्र काही मुलांच्या मस्तीमुळे दुर्घटना घडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. हरियाणा (Haryana) राज्यातील बल्लभगढ (Ballabgarh) स्टेशनवरुन एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Video) समोर येत आहे. हा व्हिडिओत मालगाडीच्या इंजिनमध्ये एक लहान मुलगा अडकलेला दिसत आहे. हा मुलगा केवळ 2 वर्षांचा असून त्याला एका 13 वर्षांच्या मुलाने आत फेकले आहे.

एका ट्विटर युजरने दिल्ली आग्रा मार्गावरील हा व्हिडिओ असल्याचे सांगत शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. मात्र युपी पोलिसांनी ट्विट करत हा व्हिडिओ हरियाणाचा असल्याचे सांगितले. 13 वर्षांच्या मुलाच्या या भयंकर कृत्यानंतर लोको पायलटच्या सतर्कतेमुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले. तसंच हे कृत्य करणारा मुलगाही पकडला गेला.

पहा व्हिडिओ:

यावर एसीपी आग्रा जीआरपी ने ट्विट करत ही घटना आग्राची नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर DY SS बल्लभगढ़ स्टेशनने ही घटना दिनांक 21-09-2020 ची असून बल्लभगढ़ स्टेशन जवळ खांबा नंबर 1499/13 जवळ झाली असल्याचे सांगितले.

दरम्यान, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे पीडित मुलाला मालगाडीच्या इंजिनखालून सुखरुप खाली काढण्यात आले. परंतु, या प्रकराच्या बेजबाबदार कृत्यामुळे त्याचा जीवही जावू शकला असता.