Ganeshotsav 2019: मराठी कलाकारांच्या घरी रंगले Eco- Friendly गणेशोत्सव सेलिब्रेशन; राकेश बापट, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव यांनी स्वतः साकारले बाप्पा

हा फोटो शेअर करत सायलीने सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा विडा उचलून मराठी कलाकारांनी देखील आपापल्या घरी स्वतःच्या हाताने बनवलेले गणपती बाप्पा आणले आहेत. याचे काही खास फोटो पहा

Marathi Celebrity Eco Friendly Ganeshotsav (Photo Credits: Instagram)

राकेश बापट याने स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून हा इकोफ्रेंडली बाप्पा साकारला आहे. दरवर्षी तो अगदी अतः पासून इति पर्यंत आपल्या बाप्पाची मूर्ती बनवतो

Raquesh Bapat (Photo Credits: Instagram)
स्मिता तांबे हिच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही eco-friendly बाप्पाचे आगामी झाले आहे. स्मिताने हा बापा स्वतःच्या हाताने साकारला आहे
Smita Tambe (Photo Credits: Instagram)
सुबोध भावे याच्या घरी सुद्धा इको फ्रेंडली बाप्पांचे आगमन झाले आहे. हे बाप्पा पुणे मेट्रोच्या देखाव्यात विराजमान झाले आहेत.
Subodh Bhave (Photo Credits: Instagram)
अमेय वाघ याच्या घरी इको फ्रेंडली बाप्पाची इवलीशी मूर्ती आणण्यात आली आहे. बाप्पांसाठी मोजकी व सुंदर अशी कागदी आरासही केलेली आहे.
Amey Wagh (Photo Credits: Instagram)
रवी जाधव यांनी आपल्या घरी स्वतःच्या हाताने बनवलेल्या बाप्पांची प्रतिष्ठापना करून इको फ्रेंडली सणाची संकल्पना जपली आहे.
Ravi Jadhav (Photo Credits: Instagram)
सोनाली कुलकर्णी हिने बाप्पाची मूर्ती साकारतानाचा हा एक गोड फोटो आपल्या फॅन्स सोबत शेअर केला आहे.
Sonalee Kulkarni (Photo Credits: Instagram)
अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी इको फ्रेंडली बाप्पांसाठी खास विटांची आरास उभारलेली आहे.
Sayali Sanjeev (Photo Credits: Instagram)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement