Maharashtra : महिला धोरणाची अंमलबजावणी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, धनंजय मुंडेंनी बदलली मंत्रालय दालनाबाहेरील नावाची पाटी

त्याचाच एक भाग म्हणनू राज्यातील सर्व कार्यालयानी कामकाजात आईचे नाव वडिलांच्या नावापुढे लावण्याची तरतूद राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांनी त्यांच्या दालनाबाहेरील त्यांच्या नावाच्या पाट्या बदलल्या आहेत.

Photo Credit - Facebook

Maharashtra  : राज्यात नव्याने घोषित करण्यात आलेल्या चौथ्या महिला धोरणातील ( Maharashtra Women's Policy)नियमाची सर्वच मंत्र्यांनी अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mundhe)तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या दालनाबाहेरील नावाची पाटी बदलली आहे. मंत्र्यांनी आपल्या आईच्या नावाचा समावेश करून ती नवी पाटी दालनाबाहेर (Change Name Plate) लावली आहे. या महिला धोरणामध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व देण्यात आले असून आईचे आयुष्यातील स्थान देखील अधोरेखित करण्यात आले आहे. (हेही वाचा:Cm Eknath Shinde: एकनाथ शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर; Mood of The Nation सर्वेत केवळ 1.9 टक्के लोकांची पसंती)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे' असे नाव त्यांच्या दालनावरील पाटीत लिहीले आहे. बाळाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात जसा वडिलांचा वाटा असतो. त्या बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचं महत्त्व देखील अधोरेखित व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील पाटी सुद्धा बदलण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण 8 मार्च रोजी लागू करण्यात आले. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर 'अजित आशाताई अनंतराव पवार' नावाची पाटी झळकली. चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अंमलबजावणी केली असून त्यांनी आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावाआधी आईचे नाव असलेली पाटी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये लावली आहे. त्यामुळे आता धनंजय यांचे संपूर्ण नाव 'धनंजय रुक्मिणी पंडीतराव मुंडे' असे नाव असणारी पाटी आता मंत्रालयात लावण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये आपले संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली असून याची अंमलबजावणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif