Video : मंगळसूत्र ओढून महिलेची थेट रुळांवर उडी ; घटना कॅमेऱ्यात कैद

विक्रोळी येथे ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्रतिकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

आतापर्यंत बाईकवरुन मंगळसूत्र ओढून फरार होण्याच्या घटना आपण पाहिल्या, ऐकल्या होत्या. पण आता ट्रेनमध्ये मंगळसूत्र ओढून थेट रुळांवर उडी मारुन एक महिला फरार झाली आहे. विक्रोळी येथे ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी या चोर महिलेला अटक केली असून सीता सोनवानी असे या महिलेचे नाव आहे.

ही महिला सीएसएमटी ते कल्याण या लोकमधून प्रवास करत होती. लोकल विक्रोळी स्थानकात आल्यानंतर तिने एका महिलेचं मंगळसूत्र ओढलं आणि थेट ट्रॅकवर उडी मारली. त्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर चढत ती फरार झाली.

सीसीटीव्ही फुटेज तपासत कुर्ला पोलिसांनी या महिलेला कळवा येथून अटक करण्यात आलं आहे.