Navi Mumbai Crime: मुलाच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांना दोषी ठरवणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा विनयभंग; आरोपी विरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल
शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने पोलिसांत डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील सीबीडी येथे राहणाऱ्या मुलाच्या मृत्यूबद्दल रुग्णालयात प्रश्न उपस्थित करणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी आरोपी डॉक्टरांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात झालेल्या निष्काळीपणामुळे 30 मे रोजी मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेने केला होता. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण आणि आजार स्पष्ट केले नव्हते. (हेही वाचा: Maharashtra Police Inspector Bail Rejected: मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस निरीक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला)
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेने डॉक्टरवर आपल्या मुलाला योग्य उपचार न दिल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. महिलेने डॉक्टरकडे याबाबत विचारणा केली असता, डॉक्टरांनी तिचा विनयभंग केला, असे त्यांनी सांगितले. महिलेच्या तक्रारीच्या आधारे, शनिवारी डॉक्टरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74 (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने मारहाण किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), 79 (शब्द, हावभाव किंवा विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने कृत्य) 351(3) (मृत्यू किंवा गंभीर दुखापत करण्याची धमकी देऊन गुन्हेगारी धमकी) आणि 352 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), पोलिसांनी सांगितले.