पश्चिम रेल्वे विस्कळीत! माटुंगा- माहीम रोड दरम्यान रुळाला तडे गेल्याने लोकल फेऱ्या विलंबाने
माटुंगा ते माहीम रोड दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली असल्याचे समजतेय
आज, शनिवारी 18 जानेवारी रोजी सकाळीच पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रवाशांना लोकलच्या विलंबित फेऱ्यांचा त्रास सहन करावा लागला आहे. माटुंगा (Matunga) ते माहीम रोड (Mahim Road) दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली असल्याचे समजतेय. परिणामी चर्चगेट (Churchgate) ते अंधेरी (Andheri) दरम्यान धावणाऱ्या लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहेत. संबंधित बिघाड लवकर सुरळीत करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत मात्र तोपर्यंत धीम्या मार्गावरील वाहतूक ही जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. महाराष्ट्र गारठले ! पुणे येथे 8.2 तर, नाशिक येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
प्राप्त माहितीनुसार, आज पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे, प्रवाशांना ब्लॉक काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी जरी हा पर्यायी मार्ग निवडला गेला असला तरीही आज सकाळचीच झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांना व्हायचा तो ताप चुकलेला नाही. या तांत्रिक बिघाडामुळे अंधेरी, वांद्रे, दादर या प्रमुख गर्दीच्या स्थानकात प्रवाशांचा खोल्मबा झालेला पाहायला मिळतोय.
M- Indicator Tweet
दरम्यान, मध्य रेल्वे वर देखील या आठवड्यात दोन वेळेस अशी परिस्थिती उदभवली होती, काल सुद्धा सायन - माटुंगा स्थानकात रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. थंडीच्या दिवसात रेल्वे रुळाला घर्षण अधिक होत असल्याने असे प्रकट वारंवार होत असल्याचे सध्या सांगितले जात आहे, मात्र कारण काहीही असले तरी कामावर जाण्याच्या वेळेत झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय.