Weather Forecast Tomorrow: कसे असेल राज्यातील उद्याचे हवामान? जाणून घ्या, 25 सप्टेंबर रोजीचा अंदाज

हवामान खात्याने 25 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार आणि ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 24 आणि 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

udyache Havaman | File Image

Weather Forecast Tomorrow: हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने 25 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार आणि ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 24 आणि 27 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याने 24 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मात्र उद्या पासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. जवळपास 27 तारखेपर्यंत राज्यात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. हे देखील वाचा: MSRTC Cash Incentive Program: महसूल आणि सेवा गुणवत्तेला चालना देण्यासाठी एसटी महामंडळाची नवी योजना; चालक-वाहकांना दिला जाणार प्रोत्साहन भत्ता

कसे असेल उद्याचे हवामान, जाणून घ्या 

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना येलो लाईट जारी करण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, पुणेला 27 सप्टेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी मात्र कोणताच अलर्ट राहणार नाही.