हवामान अंदाज: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय, 23 ते 27 सप्टेंबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, हवामान खात्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणासह अनेक ठिकाणी पावसाचा इशारा जाहीर केला आहे.
हवामान अंदाज: हवामान विभागाने 23 सप्टेंबरचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, हवामान खात्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणासह अनेक ठिकाणी पावसाचा इशारा जाहीर केला आहे. हवामान खात्याने मराठवाड्यात 23 आणि 24 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात 24 ते 27 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जाहीर केला आहे.
राज्यात मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता राज्यात मान्सून पुन्हा परतला असुन अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. (हेही वाचा, Monsoon 2024: भारतामध्ये यंदा ऑगस्ट महिन्यात15.7% सरासरी पेक्षा अधिक पाऊस; IMD ची माहिती)
Mumbai Weather Update:
उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या आणि वायव्येकडे असलेल्या मागच्या दोन कमी दाब प्रणालींचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम झाला नाही. "पुढील प्रणाली पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे आणि तिची वायव्येकडील हालचालीमुळे राज्यात पाऊस पाडू शकते." असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितले.