Weather Forecast: थंडीच्या गारव्यात पावसाचा शिडकाव; मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या सरींची शक्यता

अशा थंडाव्यातच पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Forecast) मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता आहे.

Rain (PC - Twitter/ ANI)

Mumbai Rain Update: हिवाळ्याचे दिवस असल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका तर मुंबईसारख्या शहरात वातावरणात हलकासा गारवा पाहायला मिळतो आहे. दिवसभर तळपते ऊन असले तरी, पहाट आणि सकाळी वातावरणात काहीसा थंडावा पाहायला मिळत आहे. अशा थंडाव्यातच पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Forecast) मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांमध्येही येत्या गुरुवारपासून मेघगर्जनेसह पावसाच पडेल असा अंदाज आहे. शुक्रवारी तुशळी विवाह प्रारंभ होतो आहे. दरम्यान, या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पर्जन्यवृष्टीचा अंदाज आहे, असेही हवामानाचा अंदाज सांगतो.

आठड्याच्या शेवटी आणि सुरुवातीस म्हणजेच शनिवार आणि रविवारी पावसांच्या सरींची व्याप्ती काहीशी अधिक वाढू शकेल. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव जिल्ह्यातील काही भागांमध्ये शुक्रवारपासूनच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुढचे पाच दिवस महत्त्वाचे

हवामान विभागानेपुढचे पाच दिवस महत्त्वाचे असून विदर्भ वगळता उर्वरीत भागांमध्ये पाऊस शनिवार आणि रविवारी उपस्थित दर्शवू शकतो. खास करुन या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, उर्वरीत जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

स्कायमेट या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, तामिळनाडू किनारपट्टीवर सध्या पाऊस सुुर असून तो पूर्वेकडील पश्चिकमेकडे सरकू पाहतो आहे. त्याचा प्रवास लवकरच केरळ आणि लगतच्या प्रदेशामध्ये पोहोचेल. ज्यामुळे मुंबई शहरामध्ये पावसाच्या सरी कोसळलताना पाहयला मिळतील. मुंबईमध्ये साधारण 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पावसाची उपस्थिती पाहायला मिळू शकेल. हवामान खात्याने म्हटले आहे की, मुंबईमध्ये 24 नोव्हेंबरला वातावरण ढगाळ राहू शकते. परिणामी पुढचे दोन दिवस 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी हलक्या ते मध्ये स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हा पाऊस फार काळ टिकून राहणार नाही. त्यामुळे लगेच 27 नोव्हेंबरला वातावरण निरभ्र होऊन पाऊस कमी होऊ शकतो. राज्यातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. यंदाचा मान्सून कोरडाच गेल्याने बळीराजाला पावसाची प्रतिक्षा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif