Weather Update in Maharashtra: राज्यात आजपासून पुढील पाच दिवस 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज

आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मुंबईसह (Mumbai) अनेक भागांत उकाडा जाणवत असला तरी पुढील 5 दिवसांत काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. यानुसार, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 28 आणि 29 एप्रिलला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये या जिल्ह्यात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे देखील अनेक जिल्ह्यांत आज तापमानात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच भागांत आजपासून पुढील पाच दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासोबतचं गारपीटीसह हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Monsoon Update: कोल्हापूर, ठाणे, सांगली, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर आणि नाशिक मध्ये पुढील 3-4 तासांत अवकाळी पावसाची शक्यता- RMC

आज सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि संपूर्ण मराठवाडा तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंगळवार आणि बुधवारी अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाडा जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.