Vegetable Price Increase: उन्हाचा तडाखा अन् अवकाळीमुळे भाज्यांचे दर कडाडले; किंमतीत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ
मात्र, ग्राहकांची मागणी जास्त असल्याने दर वधारले आहेत. भाज्यांच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Vegetable Price Increase: सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकीकडे तापमानाचा पार 40 अंशावर (Heat)जाऊन पोहोचला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. हवामान बदलाचा मोठा फटका भाजीपाला पिकांना बसत आहे. ऊन-पावसामुळे भाज्यांची नासाडी होत आहे. उत्पादन घटल्यामुळे भाज्यांचे दर (Vegetable Price Increase) गगणाला भिडले आहेत. मुंबईतील एपीएमसी मार्केट(APMC Market)मध्ये भाज्यांच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात भाज्यांचे दरात आणखीच वाढ होणार, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
सध्या एपीएमसी बाजारपेठेत 540 भाजीपाल्यांच्या गाड्यांची आवक होत आहे. मात्र, ग्राहकांची मागणी जास्त असल्याने दर वधारले आहेत. दररोजच्या जेवणात लागणाऱ्या भाजी पाल्यांचे आजचे दर आणि 15 दिवसांपूर्वीचे दर नेमके किती होते? जाणून घेऊयात.
आजचे भाजीपाल्यांचे दर
भेंडी 40 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. घेवडा 46 प्रति किलोने विकला जात आहे. वाटाणा प्रति किलो 100 आहे आणि फ्लोवर 20 रुपये प्रति किलो विकला जात आहे. फरसबीचे दर बाजारात 95 रुपये प्रति किलो आहे. तर शेवगा शेंगही 30 रुपये प्रति किलो आहे. दुसरीकडे काकडी 26 रुपये प्रति किलो आहे, ढोबळी मिरची 35 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. दुसरीकडे पालेभाज्यांचे आजच्या कोथिंबीरच्या एक जोडीची किंमत 20 ते 30 रुपये, पालक 18 ते 20 आणि कांदा पात 15 ते 20 तर मेथी 20 ते 22, मुळा 40 ते 50 दराने विकला जात आहे. वळी 33 रुपये प्रति किलो तर सुरण 72 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.
15 दिवसांपूर्वीचे भाजीपाल्यांचे दर
15 दिवसांपूर्वी बाजारात भेंडीचे दर प्रतिकिलो 38 रुपये होते. वाटाणा प्रति किलो 80 रुपयांनी विकला जात होता. फरसबीचे दर 70 रुपये प्रति किलो इतके होते. प्लॉवर 21 रुपये प्रति किलो तर ढोबळी मिरची 35 रुपये प्रति किलोने विकली जात होती. तर घेवडा 38 प्रति किलोने विकला जात होता. काकडी 25 रुपये प्रति किलो, शेवगा शेंगही 25 रुपये प्रति किलो, तर चवळीचे 26 रुपये प्रति किलो इतके होते. 15 दिवसांपूर्वीचे कोथिंबीरच्या एक जोडीची किंमत 20 रुपये तर मेथी 15, पालक 12 रुपयांनी विकली जात होती.