Navi Mumbai Crime: रेल्वे प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल हिसकावणाऱ्या एका चोराला वाशी जीआरपीकडून अटक

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि एका गुप्त माहितीच्या आधारे आम्ही त्याला शुक्रवारी मानखुर्द येथून अटक केली.

प्रतिकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

रेल्वे स्थानकांवर (Railway stations) चोरीचे (Theft) प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांची (Railway passengers) पाकिटे आणि मोबाईल हिसकावणाऱ्या एका 21 वर्षीय दरोडेखोराला (Robber) वाशी जीआरपीने (Vashi GRP) शुक्रवारी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे (Koparkhairane) येथील रहिवासी असलेला आरोपी इरफान अक्रम रायन हा प्लॅटफॉर्मवर फिरत असे आणि दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांचे पाकीट व मोबाईल फोन हिसकावून घेत असे. रेल्वे स्थानकांवर चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. यामुळे आता अशा चोरीच्या घटनामधील चोर पकडले जातात. हेही वाचा Mumbai Crime: शिकवणीमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीला वेश्या म्हटल्याने अंधेरीतील शिक्षिकेला अटक

वाशी जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू केसरकर म्हणाले, प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे असे गुन्हे अनेक वेळा करताना आरोपींना पकडण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि एका गुप्त माहितीच्या आधारे आम्ही त्याला शुक्रवारी मानखुर्द येथून अटक केली. आरोपीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असून यापूर्वीही त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यालाही काही महिन्यांपूर्वी शहर पोलिसांनी हद्दपार केले होते.