निम्मं घर महाराष्ट्रात निम्मं घर तेलंगणात; चंद्रपूरातील Maharajguda गावातील Uttam Pawar यांच्या घराची गजब कहाणी
दोन राज्यात निम्मं विभागलं गेल आहे पण त्याचा कधीच त्रास न झाल्याची माहिती दिली आहे.
मागील काही दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्यांवर दगडफेकीपर्यंत प्रकार पोहचला असल्याने काही काळ दोन्ही राज्यांदरम्यानची वाहतूक देखील थांबवण्यात आली.सीमावादावरील हा प्रश्न आता अधिक चिघळत जात असल्याची परिस्थिती असाताना एक इंचही जमीन दिली जाणार नाही इतपत राजकीय व्यक्तींकडून विधानं झाली आहेत. पण महाराष्ट्राच्या चंद्रपूरात एक घर दोन राज्यात विभागलं गेलं असलं तरीही एकतेची मिसाल देत उभं आहे. हे घर महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये निम्मं निम्मं वाटलं गेलं आहे.
महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेलं हे गाव चंद्रपूरातील Maharajguda गावातील आहे. Uttam Pawar यांचं हे घर आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे या घरातील 4 खोल्या महाराष्ट्रात तर अन्य 4 खोल्या तेलंगणामध्ये आहेत. महाराष्ट्रीयन कुटुंब असलेले या घराचं स्वयंपाकगृह तेलंगणा मध्ये आहे.
उत्तम पवार यांनी ANI शी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपलं घर सीमेवर आहे. दोन राज्यात निम्मं विभागलं गेल आहे पण त्याचा कधीच त्रास न झाल्याची माहिती दिली आहे. पवार कुटुंबामध्ये 12-15 सदस्य राहतात. पण त्यांच्याकडून दोन्ही राज्यातील स्थानिक प्रशासनाला कर दिला जातो. तेलंगणा सरकारी स्कीम्सचा देखील त्यांना फायदा मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
1969 मध्ये जमीनीचा सर्व्हे करण्यात आला आहे. तेव्हा उत्तम पवार यांच्या कुटुंबाला आपलं निम्मं घर महाराष्ट्रात आणि निम्म तेलंगणात असल्याचं सांगण्यात आलं पण या गोष्टीचा कधीच मनस्ताप झाला नसल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झाली आहे. पण सीमेजवळ राहणार्या काहींच्या बाबतीत अन्याय झाला असल्याच्या काही घटना समोर आल्या आहे. महाराष्ट्रात कर्नाटक सीमेसोबत विभाजन करताना बेळगाव, निपाणी, कारवार हे प्रांत कर्नाटकात गेले आहेत. मात्र तेथील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात सहभागी करून घेण्याची मागणी असल्याचा दावा करण्यात आला आहे.