Uddhav Thackeray On Mahayuti Victory: 'आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय'; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया (Video)
यावेळी ठाकरे म्हणाले, 'आज विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांचे आभार. माझा महाराष्ट्र असे करेल, असे वाटत नाही. काहीतरी चूक आहे.'
Uddhav Thackeray On Mahayuti Victory: भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील महायुतीची महाराष्ट्रात मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे. महायुती राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र समोर आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठ्या पराभवाला सामोरी जावे लागले आहे. अशात आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले, परंतु एनडीएच्या विजयाच्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केले. ती लाट नसून त्सुनामी असल्याचे निकालांवरून दिसून आले आहे, असे ते म्हणाले. पण हा जनादेश मिळवण्यासाठी त्यांनी काय केले हे समजत नाही, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (यूबीटी) पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, 'आज विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. ज्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले त्यांचे आभार. माझा महाराष्ट्र असे करेल, असे वाटत नाही. काहीतरी चूक आहे. आमच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु निकाल आला आहे, तो मान्य करावा लागेल.’ (हेही वाचा: Maharashtra New Chief Minister: 'महाराष्ट्राला 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन मुख्यमंत्री मिळणार', महायुतीच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा)
Uddhav Thackeray On Mahayuti Victory:
ते म्हणाले, हा ‘विजय’ सर्वसामान्यांना कितपत मान्य होईल हे पाहणे बाकी आहे, कारण राज्यात शेतकरी, रोजगार आणि महिलांची सुरक्षा हे प्रश्न अजूनही जैसे थे आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांवरही निशाणा साधला. राज्यात सोयाबीन आणि कापसाचे घसरलेले भाव, रोजगाराचा अभाव, उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होणे अशा अनेक समस्या असताना लोकांनी एनडीएला मतदान का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला सुरक्षेवर आणि इतर विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजपची सत्ता आल्यास महाराष्ट्राचे भले होणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. लवकरच भाजपचा नेता राज्याचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे पुढे म्हणाले की, कोविडच्या काळात कुटुंबप्रमुख म्हणून माझे ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल यावर विश्वासच बसत नाही. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतांची वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांत परिस्थिती इतक्या वेगाने कशी बदलू शकते, असे ते म्हणाले. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, हे निकाल अनपेक्षित आहेत ज्यांचे तपशीलवार विश्लेषण केले जाईल.