Uddhav Thackeray & K Chandrasekhar Rao Meet Update: आमचे हिंदुत्व चुकीचे राजकरण शिकवत नाही, देश नरकात गेला तरीही काही जण फक्त अजेंडासाठी काम करतात- उद्धव ठाकरे
येथे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या विरोधात लढा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्रित येऊ पाहत आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील आजची भेट सुद्धा त्याच संदर्भात होती.
Uddhav Thackeray & K Chandrasekhar Rao Meet Update: मोदी सरकार आणि सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थितीत करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे रविवारी मुंबईत दाखल झाले. येथे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या विरोधात लढा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्रित येऊ पाहत आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील आजची भेट सुद्धा त्याच संदर्भात होती. यापूर्वी सुद्धा ममता बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. आजच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले की, आमचे हिंदूत्व चुकीचे राजकरण शिकवत नाही. पण काही लोक हे देश जरी नरकात गेला तरीही ते त्यांच्या अजेंडासाठी काम करतात. त्यामुळे आपल्याला आपला देश योग्य मार्गावर आणला पाहिजे. तसेच पंतप्रधान कोण असेल हे नंतर पाहू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर के. चंद्रशेखर राव यांनी असे म्हटले की, केंद्राच्या एजेंसीचा वाईट पद्धतीने वापर करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. पण केंद्र सरकारने त्यांची योजना बदलली पाहिजे. कारण त्यांनी तसे न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. देशाने बहुतांश गोष्टी पाहिल्या आहेत. पुढे त्यांनी असे म्हटले की, लवकरच तुम्हाला याचा उत्तम निकाल दिसून येईल. मी उद्धव ठाकरे यांना तेलंगणा येथे येण्यासाठी आमंत्रण दिले आहे.(तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे घेतली भेट)
Tweet:
आम्ही दोघे (केसीआर आणि उद्धव) भाऊ आहोत कारण आमच्या राज्यांची 1,000 किलोमीटरची सीमा आहे. महा सरकारच्या सहकार्याने आम्ही कलेश्वरम प्रकल्प उभारला ज्याचा तेलंगणाला फायदा झाला. आम्ही महाराष्ट्रासोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत असे ही के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. आम्ही विकासात्मक समस्या सुधारणे आणि वेगवान करणे आणि देशात संरचनात्मक आणि धोरणात्मक बदल आणणे यावर विस्तृत चर्चा केली आहे. आम्ही सर्व मुद्द्यांवर सहमत आहोत असे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे.