Pune Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार, पुण्यातील घटना

पोर्शे अपघातामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर हादरलं होते. या अपघातानंतर ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला.

Accident in pune PC TWITTER

Pune Accident: पुण्यातील अपघात मालिका काही थांबायचे नावच घेत नाही. पोर्शे अपघातामुळे  गेल्या काही दिवसांपासून शहर हादरलं होते. या अपघातानंतर धडकी भरवणारा अपघात घडला आहे. ट्रकच्या धडकेत दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघे जण जागची ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खराडी बायपासच्या परिसरात घडली आहे. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ उडाला होता. (हेही वाचा- मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज एक तास बंद राहणार; 'येथे' तपासा पर्यायी मार्ग

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीला पाठी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकने दोघांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. ही घटना खराडी येथील जकात नाका भागात झाली. अपघातनंतर रस्त्यावर वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. आदिल शेख असं एका तरुणाचे नाव आहे. तर दोघांची ओळख अद्याप समोर आली नाही.

पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळावरून आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असं आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. सोमवारी तिघे जण दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमीला रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा अपघात भीषण होता. ट्रक सोबत दोघे जण फरफटत गेले. त्यामुळे त्याचा मृत्यू जागीच झाला. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहे.