Dombivli मध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी

भिंतीचे काम सुरू होताच ती कोसळली. त्यामुळे दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबईला लागून असलेल्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) परिसरात भिंत कोसळून (Wall collapse) दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. डोंबिवली रेल्वे मार्गाच्या बाजूला ही भिंत बांधली जात आहे.  भिंतीचे काम सुरू होताच ती कोसळली. त्यामुळे दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अग्निशमन दलाचे (Fire brigade) पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. डोंबिवली पश्चिम भागात हा अपघात झाला. दुपारी 4.30 च्या सुमारास अचानक ही भिंत कोसळली. त्याखाली पाच मजूर उभे होते.

भिंत कोसळल्याने सर्वजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने त्यांना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. मात्र दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन मजूर जबर जखमी झाले. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी मजुरांना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा Panvel Murder Case: अखेर 'त्या' पनवेलमधील हत्येचे सत्य आले समोर, प्रियकरासोबत राहण्यासाठी त्याच्या पत्नीची केली हत्या, फेसबुकवरून शोधला कॉन्ट्रॅक्ट किलर

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.  पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. डेब्रिज हटवण्याचे काम जोरात सुरू आहे. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या पाच मजुरांची नावे आणि ओळख समोर आली आहे. मल्लेश चव्हाण आणि बंडू कोवासे अशी जागीच मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मल्लेश चव्हाण यांचे वय 35 वर्षे तर बंडू कोवासे यांचे वय 50 वर्षे आहे.

याशिवाय माणिक पवार, विनायक चौधरी आणि युवराज गुट्टवार हे तिघे जखमी झाले आहेत. माणिक पवार यांचे वय 62 वर्षे आहे तर इतर दोन मजुरांचे वय 35 वर्षे आहे. अपघातामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. स्थानिक लोकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली आणि जखमींना त्यांच्या येण्याआधीच मदत करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.