'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे मुंबई, गुजरात, दिल्लीत कोरोनाचा फैलाव; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा
भारतात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मुंबई (Mumbai), गुजरात (Gujarat) आणि दिल्लीमध्ये (Delhi) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांच्या मनात घबराट पसरली आहे.
भारतात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. मुंबई (Mumbai), गुजरात (Gujarat) आणि दिल्लीमध्ये (Delhi) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांच्या मनात घबराट पसरली आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवरून यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या स्वागतासाठी खूप मोठा जनसमुदाय एकत्र आला होता. यामुळेच गुजरातमध्ये कोरोनाची लागण झाली. एवढेच नव्हे तर, शिष्टमंडळातील काही व्यक्ती मुंबई आणि दिल्लीत देखील गेले होते. म्हणून कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधील साप्ताहिक स्तंभात संजय राऊत म्हणाले आहेत.
अमेरिकेतून ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही. संक्रमण वाढणे ही चिंता आहे. ही चिंता राष्ट्रव्यापी असायला हवी. महाराष्ट्रात संक्रमण वाढले म्हणून राष्ट्रपती शासन लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात, हे धक्कादायक आहे, असे देखील अग्रलेखात म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. ट्रम्प आपल्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठ्या जल्लोषात विमानतळावर स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर मोठी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटेरा स्टेडिअमवर लाखो लोकांच्या उपस्थितीत ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले होते. त्यानंतर ते दिल्लीला गेले होते. हे देखील वाचा- मुंबईतील शिवसेना शाखांचे रुपांतर दवाखान्यात होणार; राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
केंद्राचे सरकारही कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले म्हणून त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल. कोरोना झपाट्याने वाढला याचे कारण केंद्राकडे या लढाईसंदर्भात कोणतेही नियोजन नव्हते. उपाययोजना नव्हत्या. लॉकडाऊन कसे अपयशी ठरले याचे सगळ्यात उत्तम विश्लेषण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय लॉकडाऊन केले. आता कोणताही प्लॅन नसताना लॉकडाऊन उठवण्याची जबाबदारी राज्या-राज्यांवर सोडली. हा गोंधळ आहे. संकट वाढवणारा हा गोंधळ आहे, अशी टीका सामना अग्रलेखात करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)