पुण्यात आज आणखी 3 कोरोना बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात मृतांची संख्या 21 वर
ही परिस्थिती खूपच धक्कादायक असून पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 154 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या तसेच त्यातील मृतांची संख्या देखील वाढत चालली आहे. पुणे (Pune) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आज आणखी 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 21 वर गेला आहे. ही परिस्थिती खूपच धक्कादायक असून पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 154 इतकी झाली आहे. पुण्यासारख्या शहरात कोरोना बाधितांची मृतांच्या आकड्यात इतक झपाट्याने वाढ होत राहणे हे चित्र खूपच चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 1297 झाली आहे. यामध्ये मुंबई 143, पुणे 03, पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01, नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04, मीरा-भाईंदर 01, वसई विरार 01, सिंधुदुर्ग 01, अशा 162 नव्या रुग्णांची भर पडली आहे. Coronavirus: लॉक डाऊनच्या काळात पुणेकरांनी तोडले सर्वाधिक नियम; राज्यातील एकूण 27,432 गुन्ह्यांपैकी पुण्यात 3,255 गुन्ह्यांची नोंद
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले लॉक डाउन व प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, पोलिसांनी महाराष्ट्रभर 27,432 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांसंदर्भात आतापर्यंत तब्बल 1,886 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे पुणे (Pune) जिल्ह्यात नोंदवले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबईत 1,679 गुन्हे, पुण्यात 3,255, पिंपरी चिचवडमध्ये 1,933, नागपुरात 1,999, सोलापुरात 2,594 आणि अहमदनगरमध्ये 2,449 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 438 जणांवर विलगीकरणबाबत उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यासह लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्याबाबत 60 गुन्हे नोंदवले गेले आहेत व याप्रकरणी 161 लोकांना अटक करण्यात आली आहे.