Sanjay Raut On Thackeray Family Security: 'ते आम्हाला गोळ्या घालू शकतात किंवा तुरुंगातही टाकू शकतात'; ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कोणतीही कमी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात राज्याच्या गृहविभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

Sanjay Raut (Photo Credit: ANI)

Sanjay Raut On Thackeray Family Security: शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दादरमधील ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्री बाहेर लावलेले मेटल डिटेक्टर काढून टाकण्यात आले असून दोन विशेष पोलीस दलाचे अधिकारी बंदूकधारी, तेथे तैनात असलेले सहा पोलीस कर्मचारी देखील काढून टाकण्यात आले आहेत. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेत घट करणे यामागे राजकीय हेतू आहे. ईडीचे छापे असोत किंवा उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेतील घट, या सर्वांवर राजकारणाचा प्रभाव आहे. त्यांना (भाजप) त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. ते (भाजप) जास्तीत जास्त काय करू शकतात? ते आम्हाला गोळ्या घालू शकतात किंवा तुरुंगात टाकू शकतात. (हेही वाचा - Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे भाजपा सोबत हातमिळवणी करण्यास तयार होते पण 'या' अटीवर - दीपक केसरकर (Watch Video))

दरम्यान, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कोणतीही कमी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात राज्याच्या गृहविभागाने स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी याबाबत खोटे बोलू नये, असेही ते म्हणाले.

एक दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षा ताफ्यातून अतिरिक्त वाहने हटवण्यात आल्याची बातमी आली होती. त्याचवेळी मातोश्रीवर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारीही कमी करण्यात आल्याचे उद्धव गटाच्या एका नेत्याने सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी तामिळनाडूचे वीज मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. विरोधी पक्षांना धमकावण्याचे काम ईडीकडून केले जात असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. ईडी नसती तर महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं नसतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.