Driving Licence Suspension: वाहतूक नियमांचे उल्लंघन वारंवार केल्यास थेट चालकाचा परवाना होणार रद्द: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच ते सहा वेळा दंड ठोठावण्यात आलेल्या वाहन चालविण्याचा परवाना आता काही महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राज्यात गेल्या काही दिवसात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या विविध अपघाताच्या घटना कानावर पडत आहेत. याच अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुक नियमांबाबत (Traffic Rules) आणि रस्ते सुरक्षा उपायांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकी दरम्यान वाहतुक व्यवस्थेबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच ते सहा वेळा दंड ठोठावण्यात आलेल्या वाहन चालविण्याचा परवाना आता काही महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन केल्यास वाहनचालकास वारंवार दंड ठोठावला जात असल्याचे दिसून येते. पण दंड देवून ते लगेच आपली सुटका करता आणि एकचं चूक पुन्हा वारंवार करतात. म्हणजे वाहतुक परवाना भरल्यानंतरही तो वाहतुक नियमांचे पालन करेल अशी काहीही शाश्वती नाही. वाहतुक नियमांचे वारंवार उल्लंघन करुण दंड भरणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करत राहणे, हे त्या वाहतुक चालकासाठी काही नवीन नसतं. पण आता यापुढे असं होणार नाही. आता वारंवार वाहतुक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असुन त्यांचा वाहन परवाना रद्द केल्या जातो. शिक्षा म्हणून त्यांचा परवाना काही महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारकडून (Maharashtra Government) घेण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Nitin Gadkari Statement: केंद्र सरकार मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान एक्सप्रेस हायवेचे नियोजन करत आहे, नितीन गडकरींचे विधान)
तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai Pune Express Way) मार्गावर लेन जंपिंग करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचा निर्णयही घेतला. हे पथक "वाहन चालकांचा पाठलाग करेल" आणि जंपिंग लेनसाठी त्यांना दंड करेल, ज्यामुळे अनेकदा रस्ते अपघातास आळा बसण्यास मदत होईल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2022 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

