IPL Auction 2025 Live

CAA Protest हिंसाचारावरून शिवसेनेचा मोदी सरकार वर हल्लाबोल; 'दिल्लीची इतकी बदनामी यापूर्वी झाली नव्हती'

दिल्लीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आले असताना अहमदाबाद मध्ये 'नमस्ते' आणि दिल्लीमध्ये 'आगडोंब' ही गोष्ट भयावह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Shivsena, BJP (Photo credit: Archived, edited, representative images)

दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपा आणि मोदी सरकारला फटकारलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये शिवसेनेने दिल्लीतील हिंसाचार हा भयपट असल्याचं सांगत दिल्लीची इतकी बदनामी यापूर्वी कधी झाली नव्हती असंदेखील त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आले असताना अहमदाबाद मध्ये 'नमस्ते' आणि दिल्लीमध्ये 'आगडोंब' ही गोष्ट भयावह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Delhi Violence: दिल्ली हिंसाचारात 13 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी; रात्री 12 वाजता न्यायाधीशांच्या घरी पार पडली सुनावणी.  

मागील 2-3 दिवसांमध्ये नॉर्थ ईस्ट दिल्ली शहरामध्ये सीएए विरोधक आणि समर्थकांमध्ये झटापट झाली. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यावरील रक्ताच्या सड्यांनी, आक्रोश, किंकाळ्या, अश्रुधुरांच्या नळकाड्यांनी, दिल्लीतील या भयपटाने व्हावे हे बरे नाही. डोनाल्ड ट्रम्प हे प्रेमाचा संदेश घेऊन दिल्लीमध्ये आले, पण त्यांच्या समोर हे काय घडले? दंगलीमागची कारणे काहीही असोत, पण देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. असा आरोपदेखील शिवसेनेने लावला आहे.

1984 सालचा शीखविरोधी दंगलीचा ठपका आजदेखील काँग्रेसवर ठेवला जातो. आजचं दिल्लीतलं वातावरण 1984 च्या दंगलीचीच भयाण वास्तवता दाखवणारे आहे. दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पण लष्करानं ते वृत्त फेटाळलं आहे. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? याआधी ‘बुरखा’ घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवट्यात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही. असं म्हणत त्यांनी या दंगलीबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली दंगलीमध्ये मागील 2-3 दिवसांत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.