उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (Photo Credit : Facebook, Shivsena)

'हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या (Muslim Population) बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) वेगाने वाढते आहे व सक्तीचे कुटुंब नियोजन हाच त्यावरचा उपाय आहे. समान नागरी कायदा आणून ‘हम पाच-हमारे बीस-पचीस’ ही मनमानी बंद केल्याशिवाय मुस्लिमांच्या लोकसंख्येला आळा बसणार नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले आहे'. तसेच, मुसलमानांच्या वाढणार्‍या लोकसंख्येस उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी ‘हम दो-हमारे दो’चा नाद सोडून मुसलमानांप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यावा असा दिव्य विचार काही हिंदुत्ववादी लोक मांडत असले तरी ते चुकीचे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. समनात लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी देशामध्ये वाढत असलेल्या मुस्लिम लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करत टीका केली आहे. 'याच वाढत्या मुसलमानी लोकसंख्येने एकदा देशाचे विभाजन झाले व तीच लोकसंख्या अधूनमधून देशात अशांतता, अस्थिरता निर्माण करीत असते. आताही एक नवा चिंताजनक प्रकार समोर आला आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवलेल्या एका अहवालाचा हवाला देत उद्धव यांनी आपल्या लेखातून टीका केली आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्रीसाहेब ...! तर,राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही - शिवसेना)

राजस्थानातील हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा नेहमीच संवेदनशील राहिली आहे. त्याच भागात जेव्हा मुस्लिम लोकसंख्या अचानक बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने वाढते तेव्हा तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकाच ठरतो. आसाम, पश्चिम बंगाल ही राज्ये याच पद्धतीने गेल्या काही दशकांत मुस्लिमबहुल बनली आहेत. त्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट मंडळींना जबाबदार धरणारेच आज केंद्रात आणि राजस्थानात सत्तेत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नेहमीच बेकायदा नागरिकांना देशातून हाकलून लावण्याची आणि घुसखोरांना देशात पाऊल ठेवू न देण्याची भाषा करीत असतात, मग आता राजस्थान सीमेवर अचानक जी ‘हिरवी घुसाघुशी’ सुरू आहे त्याचे काय?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.