Shiv Jayanti 2021: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर यांच्याकडून शिवजयंती निमित्त खास ट्वीट करत शिवरायांना अभिवादन!
महाराष्ट्र सरकारने सध्या कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरामध्ये राहूनच शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केले आहे.
महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 वी जयंती आहे. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्रात त्यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आजही त्यांच्या पराक्रमी व्यक्तिमत्त्वाची जगाला भूरळ पडत आहे. यंदा कोरोना वायरस संकटामुळे शिवजयंती (ShivJayanti) साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आले असले तरीही महाराष्ट्रात घराघरामध्ये आज जय शिवरायच्या घोषणा घुमत आहेत. आज अनेकांनी सोशल मीडीयामध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारी ट्वीट, फोटोज शेअर करून नागरिकांनी शिवजयंती ऑनलाईन सेलिब्रेट करण्यासाठी सुरूवात केली आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्यासह अनेकांनी शिवजयंती निमित्त खास ट्वीट करत महाराजांना अभिवादन केले आहे. (नक्की वाचा: Shiv Jayanti 2021: छत्रपती शिवाजी महाराज यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नमन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी गडावर साजरा केला शिवजन्मोत्सव).
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवजयंती निमित्त ट्वीट करताना त्यांच्या आवाजातील एक खास व्हिडीओ शेअर करत महाराजांना मानाचा मुजरा केला आहे.
राज ठाकरे ट्वीट
रितेश देशमुख
उर्मिला मातोंडकर
सचिन तेंडुलकर
महाराष्ट्रात शिवजयंती तारखेनुसार आणि तिथीनुसार अशा दोन दिवशी साजरी केली जाते. महाराष्ट्र सरकार तारखेनुसार शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करते. त्यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवनेरी किल्ल्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह 100 शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती 2021 चा कार्यक्रम पार पडला आहे.
महाराष्ट्र सरकारने सध्या कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घरामध्ये राहूनच शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केले आहे.