Shirish Maharaj More Suicide: संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या, वारकरी सांप्रदायात खळबळ

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याने देहूगावात आणि वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज आहे.

Shirish Maharaj More | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करुन जीवन संपवल्याने वारकरी सांप्रदयात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांचा विवाह ठरला होता. येत्या 20 फेब्रुवारीस त्यांचा विवाह संपन्न होणार होता. मात्र, विवाहाच्या अवख्या 15 दिवस आधी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. त्या चिठ्ठीतील तपशील अद्याप पुढे येऊ शकला नाही. देहू येथील राहत्या घरी उपरण्याने गळफास घेतलेल्या आवस्थेत त्यांचा मृतदेह आज (बुधवार, 5 फेब्रुवारी) सकाळी साडेआकराच्या सुमारास आढळून आला.

राहत्या घरात गळफास

संत तुकमराम महाराज यांचे वंशज असलेले शिरीष महाराज मोरे हे कीर्तन करत असत. अलिकडेच त्यांनी नवे घरही बांधले होते. ज्यामध्ये आपल्या आईवडीलांसोबत ते राहात असत. घराच्या खालच्या मजल्यावर आईवडील आणि वरच्या मजल्याव महाराज राहात असत. घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (4 फेब्रुवारी) रात्री आकराच्या सुमारास ते झोपण्यासाठी वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेले. मात्र, आज सकाळी साडेआठ वाजले तरी ते खाली आले नाहीत. दैनंदिन सवयीनुसार या वेळी ते खाली येतात पण आज आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा ठोठावला असता त्यांनी आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही. (हेही वाचा, Dr. Kisan Maharaj Sakhare Passes Away: ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन; पुण्यात वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

 

कुटुंबांनी तोडला घराचा दरवाजा

शिरिष महाराज मोरे हे कुटुंबीयांनी दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडून कुटुंबीयांनी घरात प्रवेश केला असता, त्यांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेल्याल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या कृत्याने कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांनी तातडीने देहूरोड पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, महाराजांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यावरुन आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असल्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. (हेही वाचा, Baba Maharaj Satarkar Passes Away: बाबा महाराज सातारकर यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

तुकाराम महाराज यांचे आकरावे वंशज

दरम्यान, संत तुकाराम महाराज यांचे आकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. शिवाय निगडी येथे त्यांचे एक इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या जाण्याने देहूगावावर शोककळा पसरली आहे.

वाचकांसाठी सल्ला: जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील कोणीही व्यक्ती मानसिक ताण, मानसिक आरोग्यविषयक समस्या किंवा इतर कोणत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त असाल, तर कृपया व्यावसायिक मदत घ्या किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. विनामुल्य सेवा आणि माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. हे सर्व क्रमांक टोल फ्री आहेत. त्यावरुन मागितलेल्या मदत, मार्गदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:

टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड:  080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन:  080-23655557; आयकॉल:  022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे):  0832-2252525.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now