शरद पवार यांनी त्यांच्या पावसातील सभेचं गुपित सांगितलं एका चिमुरड्या मुलीला; पहा काय म्हणाले पवार
एका ऍक्टमध्ये राधिका पवार या बालगायिकेने शरद पवारांना 5 असे प्रश्न विचारले की ज्यामुळे शरद पवारांनी सुद्धा तिला एक गुपित सांगितले.
'युवा सिंगर एक नंबर' ही सुरेल गाण्यांची मैफल आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा 11 नोव्हेंबर रोजी रात्री 9:30 वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होणार असून या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात दिवाळी दरम्यान झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या उपस्तिथीत हा सोहळा पार पडला. ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे 6 अंतिम प्रतिस्पर्धी होते. विशेष म्हणजे एका ऍक्टमध्ये राधिका पवार या बालगायिकेने शरद पवारांना 5 असे प्रश्न विचारले की ज्यामुळे शरद पवारांनी सुद्धा तिला एक गुपित सांगितले.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचं नाव बरंच चर्चेत राहिलं ते म्हणजे त्यांच्या झंझावाती प्रचार सभांमुळे. आणि म्हणूनच राधिकाच्याही प्रश्नांचा ओघ हा या प्रचार सभांना घेऊनच होता. तिने पहिला प्रश्न विचारला की, " तुमच्या पायाला एवढी मोठी दुखापत झाली असतानासुद्धा महाराष्ट्रात एवढ्या सभा तुम्ही कशा घेतल्यात?" त्यावर पवार तिला उत्तर देताना म्हणाले,” मला कुणीतरी सांगितलं की मला हे जमणार नाही, तर 'मला हे जमणार नाही' हे वाक्य माझ्या शब्दकोशात नाही."
नाशिक: पिकाची नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
राधिकाचा एक प्रश्न ज्यात पवारांनी त्यांचे गुपित सांगितले तो म्हणजे "मी पावसात भिजायला गेले तर माझे आजोबा मला भरपूर रागवतात तर तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसं काय भाषण दिलं?" यावर पवार राधिकाला म्हणाले "पावसात भिजण्यामुळे, तुझे आजोबा जरी तुला रागावत असले, तरी मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला आणखी मते देऊन मतांचा पाऊस पाडला."