Parbhani Crime: परभणीत खळबळजनक घटना, कामावर का गेला नाही; पत्नीच्या प्रश्नामुळे पतीने उचलले टोकाचे पाऊल

परभणी जिल्ह्यात एका पतीने पत्नीला विष पाजल्याची घटना उघडकीस आली आहे. कामावर का गेला नाहीस अशी विचारणा करतात पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Parbhani Crime: परभणी जिल्ह्यात एका पतीने पत्नीला विष पाजल्याची घटना उघडकीस आली आहे. कामावर का गेला नाहीस अशी विचारणा करतात पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.ही घटना बुधवारी सांयकाळी घडली आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परभणी जिल्ह्यातील नानलपेठ ठाण्याच्या हद्दीतील नेहरूनगर भागात घडली. (हेही वाचा- पत्नीशी संपत्तीवरून वाद, पतीची गळफास घेऊन आत्महत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, पतीने कौटुंबिक वादातून आणि कामाला का गेला नाही अशी विचारणा केल्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने  पत्नीला विषारी द्रव पाजले आहे. या खळबळजनक घटनेमुळे गाव हादरलं आहे. शीतल नारायण पवार असं पीडित महिलेचे नाव आहे. आणि नारायण पवार असं आरोपीचे नाव आहे. २०१२ रोजी दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना दोन मुलं झाली. काही दिवसांपासून त्यांच्या छोट्याछोट्या गोष्टींवर भांडण होत होती. दरम्यान  बुधवारी सांयकाळी नारायण हा घरी असताना शीतलने त्याला कामावर का गेला नाहीस अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग मनात धरत पत्नीला शिवीगाळ केली. भांडण  एवढं वाढलं की, पतीने पत्नीला विष पाजले आणि तीला जिवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने आरडाओरड केल्याने सासू आणि इतर नातेवाईकांनी पीडितेची सुटका केली. पीडितेवर शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु केल्यानंतर पोलिसांना या घटनेची जबानी देण्यात आली. पीडितेने दिलेल्या जबानीमुळे पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पुढील घटनेचा तपास करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement