सातारा: विधानसभा, लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार तब्बल 12 तास उशीराने; कारण घ्या जाणून

त्यामुळे सातारा विधानसभा, लोकसभा निवडणूक निकाल 12 तास उशीरांनी मिळू शकेल, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Udayanraje Bhosale, Shriniwas Patil | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या (गुरुवार, 24 ऑक्टोबर) पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून हे निकाल हळूहळू जाहीर होतील. संपूर्ण महाराष्ट्रभर हे निकाल असेच जाहीर होतील. मात्र, याला सातारा जिल्हा अपवाद ठरणार आहे. सातारा विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल संपूर्ण हाती येण्यास आणि जाहीर होण्यास तब्बल 12 तास लागतील. त्यामुळे सातारा विधानसभा, लोकसभा निवडणूक निकाल 12 तास उशीरांनी मिळू शकेल, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली तेव्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग उपस्थित होते. या वेळी बोलताना पोलीस अधिक्षक सातपुते यांनी सांगितले की, विधासभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीची मतमोजणी एमआयडीसीमधील वखार महामंडळ येथे पार पडणार आहे. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था पार पाडण्यासाठी यंदा पाच हजार पोलिस तैनात असतील. ही निवडणूक 31 फेरीत होईल. त्यास 12 तास लागतील. व्हीव्हीपॅट चिट्टीची मजणी करण्यास 1 तास लागू शकेल. सर्व ठिकाणची मतमोजणी पूर्ण करण्यासाठी साधारण 12 तास इतका कालावधी लागू शकतो, अशी माहितीही समघल यांनी दिली. (हेही वाचा, शरद पवार यांच्या सभांमुळे शिवसेना पक्षासमोर चिंता? राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चुकवणार सेनेच्या बाणाचा नेम?)

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी या वेळी अवाहन केले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. त्यासाठी मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने ठरवून दिलेल्या जागेवरच लावावीत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, कोरेगांव विधानसभा मतदारसंघ, पाटण विधानसभा मतदारसंघ, फलटण विधानसभा मतदारसंघ, माण विधानसभा मतदारसंघ, वाई विधानसभा मतदारसंघ,सातारा विधानसभा मतदारसंघ सोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानासाठी ही मतमोजणी पार पडेल.