Koyna Dam Earthquake: कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, धरणाला कोणताही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

साताऱ्यातील (Satara) कोयना धरण (Koyana Dam) परिसरात भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमिटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती.  (हेही वाचा - Earthquake in Chhattisgarh: छत्तिसगड बिलासपूरमध्ये रिश्टर स्केल 3.1 तीव्रतेचा भूकंप)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टिकरण धरण व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जानवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now