Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारी साठी होणार प्रस्थान
19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.
Ashadhi Wari Sant Tukaram Palkhi 2023: वारकरी संप्रदाय दरवर्षी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) पंढरपूरात विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पायी वारी करत दाखल होतात. आज 10 जून दिवशी देहू नगरी मधून संत तुकारामांची पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) प्रस्थान ठेवणार आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी शेकडो वारकरी देहुत दाखल झाले असून दुपारी 2 च्या सुमारास पालखी प्रस्थान ठेवेल. 19 दिवसांचा प्रवास करून 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 338 वं वर्ष आहे. पायी वारी न करू शकणार्या जगभरातील भाविकांना या डिजिटल युगामध्ये ही वारी देखील डिजिटली अनुभवता येणार आहे.
आज देहु नगरी मध्ये रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत. 29 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. दरम्यान 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण, 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण, 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. तर 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल तर 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे दुसरे उभे रिंगण अनुभवता येणार आहे. Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरसाठी 5000 जादा बसेस सोडण्यात येणार.
पहा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा
पालखीचा कसा असेल प्रवास?
वारकर्यांच्या आरोग्य आणि सुरक्षा जपण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. या पालखींच्या मार्गांवर अनेक सेवाभावी संस्था, स्थानिक लोकं वारकर्यांना मदतीचा हात देतात. आपली सेवा अर्पण करतात. आज तुकारामांच्या पालखी प्रस्थानानंतर आळंदी मधून उद्या 11 जून दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देखील प्रस्थान होणार आहे. अन्य काही पालख्यांचा यापूर्वीच पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.