सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांवर सशस्त्र दरोडा, तासगाव-विसापूर रस्त्यावरुन 25 लाख पळवले

दरम्यान, दुचाकी आणि इतर वाहनावरुन आलेल्या काही दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांची गाडी रस्त्यातच आडवली. त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून ही रक्कम लंपास केली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Armed Robbery on Sangli District Central Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सशस्त्र दरोडेखोरांनी तब्बल 25 लाख रुपयांची रक्कम भरदिवसा लंपास केली. ही घटना तासगाव-विसापूर (Tasgaon-Visapur road) रस्त्यावर सांगली जिल्ह्यात घडली. बँक कर्मचारी रोखड घेऊन जात असताना पाठिमागून आलेल्या दरोडेखोरांनी पाळत ठेऊन हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (16 जुन 2019) दुपारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काही कर्मचारी हे 25 लाख रुपयांची रोखड घेऊन निघाले होते. दरम्यान, दुचाकी आणि इतर वाहनावरुन आलेल्या काही दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांची गाडी रस्त्यातच आडवली. त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून ही रक्कम लंपास केली.

दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेत नाकाबंदी केली आहे. सांगली जिल्ह्यातून सातारा, सोलापूर आणि कर्नाटक राज्यात जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. दरोड्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, मुथुट फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोडा: 1 ठार दोन गंभीर जखमी, नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील घटना)

दरम्यान, राज्यात घडलेली सशस्त्र दरोड्याची ही आजची एका दिवसातील ही दुसरी घटना आहे. आज सकाळीच नाशिक शहरातील उंटवाडी येथील मुथुट फायनान्स कार्यालयावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोड्यावेळी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.