Samruddhi Mahamarg Update: समृद्धी महामार्ग ऑक्टोबर महिन्यात राहणार 5 दिवस बंद; जाणून घ्या कारण आणि पर्यायी व्यवस्था

10 ते 12 ऑक्टोबर आणि 25 ते 26 ऑक्टोबर असे पाच दिवस हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.

Samruddhi Mahamarg

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Update) वापरुन तुम्ही जर प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 10 ते 12 ऑक्टोबर आणि 25 ते 26 ऑक्टोबर असे पाच दिवस हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर करुन तुम्ही जर प्रवास करणार असाल तर वर उल्लेख केलेले दिवस टाळण्यास प्राधान्य द्या. ज्यामुळे आपला प्रवास विनाअडथळा आणि विना मनस्ताप पार पडेल. जालना इंटरचेंज ते सावंगी मार्गावरील टॉवरचे काम सुरु आहे. प्रामुख्याने हे काम केल्या जाणाऱ्या दिवशीच महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी माहिती देताना सांगितले की, विविध कामांसाठी हा समृद्धी महामार्ग 10 ते 12 ऑक्टोबर आणि 25 ते 26 ऑक्टोबर असे पाच दिवस हा महामार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान, महामार्ग बंद असल्याच्या काळात नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

कसा असेल पर्यायी मार्ग?

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील एक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या महामार्गाचे मूळ नाव हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा एक हाय-स्पीड एक्स्प्रेस वे आहे ज्याचा उद्देश मुंबई शहराला नागपूर शहराशी जोडणे आहे. ही दोन प्रमुख शहरे आणि मार्गावरील इतर अनेक गावे आणि शहरे यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारून या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. हा एक्स्प्रेस वे प्रकल्प मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आणि त्याच्या कॉरिडॉरसह औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला. यामध्ये बहु-लेन, हाय-स्पीड, टोल एक्स्प्रेस वेचे बांधकाम समाविष्ट आहे, ज्याचा महाराष्ट्रातील व्यापार, वाणिज्य आणि वाहतुकीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, वेगवान वाहनांचे टायर फुटणे, त्यमुळे अपघात होणे, याशिवाय विविध वन्य प्राण्यांना धडक बसून ते मृत्यमुखी पडणे किंवा गंभीर जखमी होणे यांसारख्या अनेक गोष्टींमुळे हा महामार्ग चर्चे राहिला आहे.