Sambhaji Bhide on Live in Relationship: 'लिव्ह इन रिलेशनशिप' मुद्द्यावरुन संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, वाईनच्या निर्णयावरुन राज्य सरकारवरही टीका
'लिव्ह इन रिलेशनशीप' (Live in Relationship) संकल्पनेबाबत बोलताना भिडे यांनी न्यायाधिशांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य (Sambhaji Bhide's Controversial Statement) केले आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'लिव्ह इन रिलेशनशीप' (Live in Relationship) संकल्पनेबाबत बोलताना भिडे यांनी न्यायाधिशांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य (Sambhaji Bhide's Controversial Statement) केले आहे. ' लिव्ह इन रिलेशनशीप अयोग न्याही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे', असे भिडे यांनी म्हटले आहे. या शिवाय सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्यास परवानगी दिल्याबद्दल भिडे यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भिडे बोलत होते.
'लिव्ह इन रिलेशनशीप हा कसला बेशरमपणा आहे. सलं लिव्ह इन रिलेशनशीप? लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही असं म्हणणारी न्यायालये वध्य आहेत. अशा न्यायाधीशांना त्या जागेवरुनच संपवले पाहिजे. माझ्या या वक्तव्यावर अनेकांना राग येईल, माझ्यावर गुन्हे दाखल होतील. काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत. रामशासत्री प्रभुने यांनीही भरसभेत म्हटले होते तुला देहांताशिवाय दुसरे शासन नाही,' असे संभाजी भिडे म्हणाले. (हेही वाचा, Sambhaji Bhide Controversial Statement: 'निर्लज्ज लोकांचा देश त्याचं नाव हिंदुस्तान', संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान)
राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या निर्णयाबाबत बोलताना भिडे म्हणाले, राज्य सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा एकही मंत्री, एकही आमदार या बैठकीतून बाहेर पडला नाही. असा काही निर्णय करायचा असेल तर तुमच्यात राहण्याचे पाप मी करणार नाही, असल्या आमदारकी, मंत्रीपदावर मी थुंकतो. असे एकही मंत्री अथवा आमदार म्हटला नाही, हे दुर्दैव आहे', असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही, ही आमजे दुर्दैव आहे असेही संभाजी भिडे म्हणाले.