ख्रिदापूर: सलमान खानने आपली Commitment केली पूर्ण; दत्तक घेतलेल्या गावात महापूरात उद्ध्वस्त झालेल्या 70 घरांच्या पायाभरणीला झाली सुरुवात
महापूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या येथील गावक-यांसाठी ही आनंदाची बाब असून सर्वांना एलान फाऊंडेशन आणि सलमान खानचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील विविध भागांत 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या महापुरात अनेकांचं गावांचे प्रचंड नुकसान झाले होते. घरं उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडली होती. त्यावेळी अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने पुढाकार घेत ख्रिदापूर (Khidrapur) हे गाव दत्तक घेतले होते. त्यावेळी त्याने या गावातील लोकांची पक्की घरे पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने त्यावेळी दिलेली आपली कमिटमेंट पूर्ण करत आज या गावात 70 घरे बांधण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्या हस्ते गावातील घरे बांधणीच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
एलान फाऊंडेशन (दिल्ली) व अभिनेते सलमान खान यांनी जबाबदारी घेतलेल्या 70 नवी घरे बांधण्यास या गावात सुरुवात झाली आहे. महापूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या येथील गावक-यांसाठी ही आनंदाची बाब असून सर्वांना एलान फाऊंडेशन आणि सलमान खानचे आभार मानले आहेत.
हेदेखील वाचा- Bhandara Flood: भंंडारा पुरग्रस्त भागातुन NDRF च्या पथकाने लहान मुले, गरोदर महिलेसहित 43 जणांंचे वाचवले प्राण, पहा फोटो
टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या माहितीनुसार, खिद्रापूर गावात बांधण्यात येणाऱ्या ७० घरांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने प्रत्येकी ९५ हजार रुपयांची मदत केली आहे. तर इतर खर्च हा सलमान खान आणि एलान फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार आहे. ही घरे लवकरच बांधून पूर्ण करण्यात येतील आणि त्यानंतर त्याचा ताबा ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.