Pune Road Rage Horror: पुण्यातील पाषाण येथे रोडरेजची घटना; गाडीच्या काचा फोडल्या, दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Video)
जेवणानंतर जोडपे घरी जाताना गुंडांच्या टोळीने त्यांची कार अडवली. घटनेनंतर पतीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पत्नी गंभीर जखमी आहे.
Pune Road Rage Horror: पुण्यातील पाषाण येथे एका जोडप्याला अडवून त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. 18 एप्रिलला रात्री उशिरा ही घटना घडली. जेवणानंतर जोडपे घरी जाताना गुंडांच्या टोळीने त्यांची कार अडवली (Pune Road Rage). घटनेनंतर पतीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पत्नी गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतकी भुजबळ आणि तिचे पती अमलदेव पीव्हीके रमन रात्री 11 वाजताच्या सुमारास मुकुंद नगरहून परत येत असताना त्यांच्या चाकचाकीची मद्यधूंद स्कूटर चालकाकडून वारंवार अडवून व्हायची. त्यामुळे अमल यांनी त्याला बाजूला करण्यासाठी अनेकदा हॉर्न वाजवले. या किरकोळ घटनेमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील पाषाण येथे रोडरेजची घटना
Pune Road Rage Horror: Couple Brutally Attacked by Six Men, Woman Kicked and Car Smashed @PuneCityPolice @CPPuneCity https://t.co/YQCRwrD1Xf#newsupdate #crime #pune #puneupdates #punepolice #lawandorder #crimealert #newsindia #punecrimenews #maharashtranews #maharashtra pic.twitter.com/kq3D6O085d
— Punekar News (@punekarnews) April 22, 2025
हॉर्न वाजवल्याच्या रागात मद्यधूंद स्कूटरस्वारांनी त्यांची गाडी लांबपर्यंत अडवली. काहीवेळीने ते थांबले आणि काय समस्या आहे ही विचारणा केली. तेव्हा आक्रमक झालेल्या व्यक्तीने पतीवर हल्ला केला, असे केतकी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील पोस्टवर लिहिले. या घटनेत जोडप्याला मारहण झाली आहे. तर, कारच्या खिडक्या मोठ्या दगडांनी आणि हेडलाइट्स फोडल्या आहेत. सुदैवाने अमलदेव यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी तेथून पळवली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

