Reasons of Defeat of The MVA: महा विकास आघाडीच्या पराभवाची प्रमुख कारणे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) मध्ये महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) पराभूत झाली. राज्यातील जनतेने शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस पक्षास विरोधात बसण्याचा जनादेश दिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) मध्ये महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) पराभूत झाली. राज्यातील जनतेने शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस पक्षास विरोधात बसण्याचा जनादेश दिला. धक्कादायक म्हणजे राज्याच्या विधानसभेत विरोधीपक्षनेता नसेल अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. याउलट महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात महाविकासआघाडी पराभूत का झाली याची कारणमिमांसा केली जात आहे. मविआ पराभवाची कारणे.
जागावाटपाचा घोळ
निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करुन ते मागे घेण्याची तारीख आणि त्याची वेळही संपत आली तरीसुद्धा महाविकासआघाडीचे जागावाटप निश्चित होऊ शकले नाही. अगदी शेवटच्या ठिकाणी महाविकासआघाडी जागावाटपाचाच घोळ घालत राहीली.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
महाविकासाघाडीने शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही. उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यास राज्यभरातून पसंती असली तरी, काँग्रेसने त्यात मोडता घातला. ज्यामुळे राज्यातील जनताच काय या पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही आपण कोणाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत आहोत, हे समजू शकले नाही. (हेही वाचा, Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार?)
यंत्रणा आणि संसाधनांचा आभाव
महाविकासआघाडी निवडणुकीस सामोरी जात असताना त्यांच्यासमोर संसाधनांचा मोठा अभाव होता. काँग्रेस वगळता शिवेसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांच्यात मोठी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यात निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे आणि अजित पवार यांना दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे यंत्रणा फारशी सक्षम नव्हती. आर्थिक निधी आणि एकूण निवडणूक प्रचारासाठी लागणारी यंत्रणा यांचाही या पक्षांकडे मोठा आभाव दिसत होता. त्याचाही पराभवामध्ये मोठा प्रभाव राहिला.
भाजपचा आक्रमक प्रचार
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने निवडणूक प्रचारात वेळोवेळी आणलेले वेगवेगळे मुद्दे प्रभावी ठरले. ज्यामध्ये लाडकी बहिण योजना, बचेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है... यांसारख्या मुद्द्यांना महाविकासआघाडीला सडेतोड प्रतिवाद करता आला नाही. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीच्या निवडणूक प्रचारात फारशी एकवाक्यताही दिसली नाही.
काँग्रेसकडे आवश्यकतेपेक्षा अधिक जागा
जागावाटपातही काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर घोळ घातला. महाविकासआघाडीच्या जागावाटपात स्वत:कडे अधिक जागा घेतल्या. परिणामी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षास अगदीच कमी जागा मिळाल्या. दुसऱ्या बाजूला काँग्रेच्या स्टार प्रचारकांनी हव्या त्या प्रमाणात निवडणूक प्रचारात सक्रीयता दाखवली नाही. उलट ते आपापल्याच मतदारसंघात आडकून राहिले. लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये जशी जमली तशी भट्टी महाविकासआघाडीला विधानसभा निवडणुकी जमवता आली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2024 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

