Coronavirus: कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय (Watch Video)

त्यांच्या या उपाययोजनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

कोरोना व्हायरस (Corona Virus) च्या दहशतीने साऱ्या जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी यामुळे आपले प्राण गमावलेले आहेत आणि आता चीन (China), इटली (Italy), इराण (Iran), अमेरिका (America)  पाठोपाठ भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. भारतात आतापर्यंत 40 च्या वर कोरोना संक्रमित प्रकरणे आढळली आहेत तर महाराष्ट्रात सुद्धा कालच पुणे (Pune) येथे एक दांपत्य कोरोनाने संसर्गित असल्याचे आढळून आले आहे. एकूणच यामुळे भीषण परिस्थी उद्भवली आहे. या व्हायरसला मुळासकट हटवण्यासाठी जगभरातील अनेक डॉक्टर प्रयत्न करत आहेत, अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या व्हायरस साठी अनोखा उपाय अवलंबला आहे. त्यांच्या या उपाययोजनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये आठवले चक्क करोना विषाणूला भारतामधून परत जाण्यासाठी घोषणाबाजी करताना दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई मध्ये कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी काही परदेशी नागरिक बॅनर घेऊन उभे होते.चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते.आठवले यांनी त्यांची भेट घेतली. हे परदेशी नागरिक मूळचे चीनचे असल्याने त्यांनी भारत चीन संबंध या संकटात अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त विकारात आठवले यांनी चक्क ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा द्यायला सुरवात केली. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

रामदास आठवले व्हिडीओ

दरम्यान, मंगळवारी पुणे येथे कोरोनाचे दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर नायडू रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 48 वर पोहचली आहे. हा सर्वात जास्त वेगाने पसरणारा आजार आजारी असला तरी यापासून सुखरूप बरे होता येते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif