पुणे: बेकर्स कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत
पुणे (Pune) विमानगर (Vimanagar) येथील प्रसिद्ध बेकर्स (Bakers Chemical Company) या केमिकल कंपनीला आज सकाळी आग लागली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र आगीचे स्वरूप इतके प्रचंड आहे की ज्यामुळे आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट उसळताना पाहायला मिळत आहेत. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
प्राप्त माहितीनुसार, विमाननगर भागातील बेकर्स केमिकल कंपनीला आज सकाळी सहाच्या सुमारास आग लागली होती. सुरुवातीला आगीचे स्वरूप कमी होते मात्र केमिकल कंपनीतील परंतु रसायनांमुळे या आग आणखीनच भडकली. यामध्ये संपूर्ण कंपनी जाळून खाक झाली आहे.
पहा आगीचा व्हिडीओ
दरम्यान, आग विझल्यानंतर या प्रकरणी पूर्णतः तपास करण्यात येऊ शकतो. मात्र तूर्तास आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.