पुणे: चतु:शृंगी वाहतूक विभागात पोलिस कर्मचार्याचे ऑन ड्युटी हार्ट अटॅकने निधन
सुनिल मोरे यांना पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये नेले पण तोपर्यंत उशिर झाला होता.
पुण्यामध्ये (Pune) ऑन ड्युटी एका वाहतूक विभागात पोलीस कर्मचार्याचे निधन झाले आहे. सेनापती बापट चौक जंक्शन मध्ये वाहतूक नियमन करताना उपनिरीक्षक पदावर कार्यरत सुनील मोरे (Sunil More) यांचे हार्ट अटॅकने (Heart Attack) निधन झाल्याची घटना समोर आली आहे. सुनील मोरे हे 57 वर्षीय होते. चतु:शृंगी वाहतूक विभागात ते काम करत होते. शुक्रवार 3 फेब्रुवारी दिवशी दुपारी 3 च्या सुमारास सेनापती बापट चौक जंक्शन येथे कामावर असताना त्यांना त्रास जाणवू लागला. वाहतूक नियमन करीत असतानाच त्यांचा डाव हात दुखायला लागला. त्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते थेट जमिनीवर कोसळले.
सुनिल मोरे यांना पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी नजिकच्या हॉस्पिटल मध्ये नेले पण तोपर्यंत उशिर झाला होता. उपचारांपूर्वीच त्यांचं निधन झाले होते. मोरेंना नुकतीच पदोन्नती मिळाली होती. DCP (Traffic) Vijay Kumar Magar यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे सेनापती बापट मार्गावर रोड सेफ्टीच्या ट्रायल्सच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी घरी परतत असताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले.
काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये लोकलच्या एका मोटारमॅनला देखील गाडी चालवत असताना मालाड स्थानकामध्ये भोवळ आली आणि ते कॅबिनमध्येच कोसळल्याची घटना समोर आली होती. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना भोवळ आली होती. प्राथमिक उपचारांनंतर त्यांनी ट्रेनचा उर्वरित टप्पा पूर्ण केला आणि नंतर पुढील उपचारासाठी ते रूग्णालयात दाखल झाले होते.