MHADA PUNE BOARD LOTTERY JUNE 2022 Winners List: ‘म्हाडा’ पुणे मंडळातील घर सोडतील भाग्यवान विजेत्यांची, प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची इथे पहा सविस्तर यादी!
सागर खैरनार हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते ठरले आहेत. आजच्या सोडतीमध्ये पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांचा समावेश होता.
म्हाडा च्या (MHADA) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (Pune Housing and Area Development Board) आज पुणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5211 घरांची सोडत पार पडली. आज सकाळी व्हीसी द्वारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली आहे. एकूण 5211 घरांसाठी सुमारे 71 हजार 742 अर्ज आले होते. आज यामधील भाग्यवान विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भाग्यवान विजेत्यांच्या यादी सोबतच म्हाडाने प्रतिक्षा यादी देखील प्रसिद्ध केली आहे.
सागर खैरनार हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते ठरले आहेत. आजच्या सोडतीमध्ये पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांचा समावेश होता. पुणे मंडळामार्फत म्हाडा च्या विविध योजनतील 278 सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या 2845 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2088 सदनिका अशा एकूण 5211 सदनिकांची संगणकीय पद्धतीद्वारा सोडत काढण्यात आली आहे.
इथे पहा पुणे जिल्ह्यातील निकाल
इथे पहा कोल्हापूर जिल्ह्यातील निकाल
दरम्यान म्हाडाची अधिकृत वेबसाईट lottery.mhada.gov.in यावर Lottery Result विभागामध्ये तुम्हांला आजचा सविस्तर निकाल पाहता येणार आहे. या निकालामध्ये भाग्यवान विजेत्यांच्या यादीमधील सदस्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि पुढील आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर घराचं अलॉटमेंट लेटर दिलं जाणार आहे. MHADA Pune Lottery Result 2022 Live Streaming: पुणे विभागातील 5211 म्हाडाच्या घरांसाठी सोडत सुरू; इथे पहा थेट ऑनलाईन निकाल.
दरम्यान 9 जून ते 9 जुलै दरम्यान म्हाडांच्या घरांसाठी अर्ज करण्याची वेळ देण्यात आली होती. यामध्ये 71 हजारांपेक्षा अधिक अएज आले. या घरांची सोडत 29 जुलैला काढण्यात येणार होती. पण म्हाडाने सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत राज्य सरकारकडून बदल करून नवीन उत्पन्न मर्यादेसह अर्ज भरून घेतले. संगणकीय प्रणालीत तसे बदल करून पुणे मंडळाने जुलैमध्ये अर्जस्वीकृती सुरू केली परिणामी सोडतीचा 29 जुलैचा मुहूर्त आज 18 ऑगस्ट झाला.
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2022 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

